ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची आज 94 वी जयंती आहे. यानिमित्त शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ फुलांनी सजवण्यात आलं आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्ककडे मोठय़ा संख्येने गर्दी करत आहेत.
तसंच देशभरातील दिग्गज नेत्यांकडूनही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली.
‘महान बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन. धैर्यवान बाळासाहेबांनी लोकांच्या प्रश्नांना आवाज देताना कधीही मागे-पुढे पाहिले नाही. भारतीय मुल्यांबद्दल त्यांना नेहमीच अभिमान होता. ते लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील,’ अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.