प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने रविवारी रामलिंग खिंड गल्ली येथील मध्यवर्ती कार्यालयात हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बाळासाहेब व शिवसैनिकांचे सीमाप्रश्नासाठीचे योगदान याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पुंडलिक पावशे, जिल्हा संघटक रविंद्र जाधव, उपशहरप्रमुख प्रसाद काकतकर, खादरवाडी विभाग प्रमुख रमेश माळवी, महेश टंकसाळी, अशोक काकतकर, किरण जायण्णाचे सोहम माळवी, किसन सुंठकर, संतोष मंडलिक यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.