समर्थकांसह ‘तरुण भारत’ कार्यालयास सदिच्छा भेट : विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष
वार्ताहर / सांबरा
बाळेकुंद्री खुर्द येथे वॉर्ड क्रमांक 2 मधील एका जागेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत ग्राम विकास आघाडीच्या अंजना अशोक बेळगावकर विजयी झाल्या. त्यांना 397 मते घेत मिळाली. तर भाजपा पुरस्कृत ग्राम विकास संघटनेच्या नीता महादेव सुळेभावी यांना 367 मतांवर समाधान मानावे लागले.
अलिकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नम्रता प्रशांत जाधव या वॉर्ड क्रमांक 2 व वॉर्ड क्रमांक 5 मधून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी वॉर्ड क्रमांक दोन मधील सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती.
निवडून आल्यानंतर अंजना अशोक बेळगावकर यांनी आपल्या समर्थकांसह ‘तरुण भारत’ कार्यालयास सदिच्छा भेट देऊन संस्थापक कै. बाबुराव ठाकुर यांना अभिवादन केले. याप्रसंगी ता. पं. सदस्य निलेश चंदगडकर, ग्रा. पं. सदस्य प्रविण मुरारीसह अशोक बेळगावकर, राहुल बेळगावकर, पवन जाधव, राम भागन्नावर, संतोष बेळगावकर, विठ्ठल कुरबर, राकेश बुरुड, अक्षय नीलजकर, सखाराम पाटील, परशराम चिनवाल, मनीषा होनगोजी, उज्ज्वला पावशे, नितीन पाटील, गुंडू अष्टेकर, संदीप बेळगावकर, प्रल्हाद चिनवालसह कार्यकर्ते उपस्थित होते.
लता पाटील 304 मतांनी विजयी
कंग्राळी खुर्द ः येथील ग्राम पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक 8 ची पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत सामान्य महिला लता नागोजी पाटील या 304 मते घेऊन विजयी झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीवेळी या वॉर्डमधून एकच अर्ज दाखल झाला होता. तो अर्जदेखील अवैध ठरल्याने ही पोटनिवडणूक झाली होती. त्याची मतमोजणी बुधवारी पार पडली. त्यामध्ये लता पाटील विजयी झाल्या आहेत.
या निवडणुकीत अश्विनी विशाल पाटील यांना 250 मते मिळाली आहेत. या विजयानंतर लता पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. सदर निवडणूक मोठय़ा चुरशीने पार पडली
होती.
विजयानंतर तरुण भारतला या सर्वांनी भेट दिली. यावेळी पुंडलिक पाटील, नारायण थोरवत, कल्लाप्पा पाटील, मारुती काटे, सागर पाटील, कमला पाटील, चंद्रकांत मोरे, मनोहर बुकण्णावर, प्रशांत पाटील, विष्णू दरवंदर, सुरेश पाटील, गणपत कटकोळ, मनोहर कंग्राळकर, दिनेश पाटील, चंद्रकांत मोरे, भावकू देशनूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.