बाळेकुंद्री/ वार्ताहर
बाळेकुंद्री खुर्द येथील ग्रामदेवता लक्ष्मी देवीची श्रावण मासानिमित्त मंगळवारी ओटी भरण्यात आली.सकाळी सात वाजता देवीची विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर गावातील हक्कदारांच्या उपस्थित देवीची ओटी भरण्यात आली. नंतर भाविकांच्या उपस्थितीत आरती झाली. नंतर दिवसभरात सुरक्षित अंतर राखत भाविकांनी देवीची ओटी भरली.