वैद्यकीय संचालकांना घेराव : किमान गरजा पुरविण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलमधील परिचारिका व वैद्यकीय कर्मचारी सध्या संतप्त झाले आहेत. बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांना घेराव घालून कोरोनाविरुद्ध लढणाऱया कर्मचाऱयांच्या किमान गरजा तरी पुरवा, अशी मागणी केली आहे.
कोरोना वॉर्डमध्ये सेवा बजावलेल्या एका परिचारिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वैद्यकीय कर्मचाऱयांना कोरोनाची लागण होण्याचा बेळगावातील हा पहिलाच प्रकार आहे. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय कर्मचाऱयांवरचा तणाव वाढला आहे. यातच बाधित परिचारिकेला सामान्य कोरोना बाधितांच्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आल्याने कर्मचारी भडकले आहेत.
शुक्रवारी दुपारी बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांची भेट घेऊन कर्मचाऱयांनी आपल्या मनातील आक्रोष व्यक्त केला आहे. रुग्णसेवा करता करता परिचारिकेला कोरोनाची बाधा झाली आहे. किमान तिला स्वतंत्र ठेऊन तिच्यावर उपचार करण्याची गरज आहे. असे असताना जनरल वॉर्डमध्ये तिला ठेवण्यात आले आहे. हे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
गुरुवारी रात्री उशिरा या परिचारिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तेंव्हापासूनच बिम्स कर्मचाऱयांमध्ये हा एक चर्चेचा विषय बनला होता. इतर कोरोनाबाधितांवर ज्या वॉर्डमध्ये उपचार करण्यात येते. त्याच वॉर्डमध्ये परिचारिकेलाही दाखल करण्यात आले आहे. ही गोष्ट समजताच बिम्स प्रशासनाविरुद्ध कर्मचारी भडकले आहेत.
डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आपला जीव धोक्मयात घालून रुग्ण सेवा करीत आहेत. परिस्थिती अशी असताना त्यांना चांगली वागणूक द्या, त्यांच्या किमान गरजा तरी पूर्ण करा, अशी मागणी करण्यात आली आहे. वैद्यकीय कर्मचाऱयांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची ग्वाही बिम्स प्रशासनाने दिली आहे.
सर्व सुविधा काढून घेतल्या
कोरोना वॉर्डमध्ये सेवा बजावणारे डॉक्टर व इतर कर्मचाऱयांना पूर्वी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था होती. आताही सुविधा सरकारने काढून घेतल्या आहेत. सात दिवसांची नोकरी केल्यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले जात होते. आता सात दिवसांच्या कामानंतर केवळ पाच दिवस होम क्वारंटाईन होण्याची सूचना करण्यात आली आहे. इस्पितळातून येथील कर्मचारी आपल्या घरी निघून जातात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. अनेक विभागात एन-95 मास्क दूरच साधे सर्जिकल मास्कही मिळेनात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तेथील कर्मचाऱयांनी बिम्सच्या प्रशासकीय व्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.