24 तासात कोरोनाबाधितांचा आकडा 2000 च्या पार : सरकारची डोकेदुखी वाढली
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारमध्ये कोरोनाने गुरुवारी अनोखा विक्रम स्थापित केला. एका दिवसांत संपूर्ण राज्यामध्ये कोविड-19 चे नवे रुग्ण आढळून आले. आता राज्यात एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येने 2000 चा टप्पा पार केला आहे. पाटणामध्ये शुक्रवारी सात आणि मधुबनीमध्ये 34 नवीन रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. रुग्णांची टक्केवारी वाढल्याने राज्य सरकारच्या डोकेदुखीत मोठी वाढ झाली आहे.
मागील 24 तासांत 22 कोरोना संक्रमित रुग्ण ठीक झाले असून, आतापर्यंत 593 रुग्णांनी कोरोनावर विजय प्राप्त केला आहे. राज्यात परतलेल्या सात लाख प्रवाशांपैकी 12 हजार प्रवाशांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले असून, यामध्ये 1086 जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असल्याची माहिती आरोग्य सचिव लोकेश कुमार यांनी दिली. यामध्ये सर्वाधिक संख्या दिल्लीहून परतलेल्या प्रवाशांची आहे. दिल्लीहून परतलेल्या प्रवाशांपैकी 296 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. महाराष्ट्रातून 253, गुजरातमधून 180, हरियाणामधून 66, पश्चिम बंगालमधून 58 लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत.