केएससीए धारवाड विभागीय ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा : आकाश, सात्विक सामनावीरचे मानकरी
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य मान्यताप्राप्त क्रिकेट संघटना व धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए धारवाड विभागीय ए डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत बीडीके ए संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाचा 117 धावांनी तर हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक धारवाड संघाचा 73 धावांनी प्रराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. आकाश पत्तार (हुबळी स्पोर्ट्स), सात्विक गुंजाळ यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
हुबळी केएससीए मैदानावर हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात सर्वबाद 270 धावा केल्या. आकाश पत्तारने 6 षटकार आणि 4 चौकारासह 78, सुधन्व कुलकर्णी व श्रेयस गंडल यांनी प्रत्येकी 48, डॉम्निक फर्नांडिस 2 षटकार 3 चौकारासह 34 तर चिराग नायकने 18 धावा केल्या. क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटकतर्फे लिखित बन्नूरने 46 धावात 3, तेजस मुर्डेश्वरने 29 धावात 2 तर अनिलगौडा पाटील, सुमित दिवाणी, श्रीहरी मद्याहळकर, अक्षय हिरेमठ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक अ धारवाड संघाचा डाव 42 षटकात 197 धावात आटोपला. आदित्य शियानबोगने 1 षटकार 6 चौकारासह 64, सुमित दिवानी 2 षटकार 2 चौकारासह 33, श्रेयस माद्याळकरने 23, राहुल वेर्णेकरने 21 तर सचिन रजपुतने 16 धावा केल्या. हुबळी स्पोर्ट्स तर्फे रोहन यारिसिम्मीने 44 धावात 3, रोहितकुमार एसी 20 धावात 2, आकाश पत्तारने 36 धावात 2 तर डॉम्निक फर्नांडिसने 60 धावात 2 गडी बाद केले.
आरएससी हुबळी मैदानावर बीडीके स्पोर्ट्स अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 269 धावा केल्या. सार्थक गुंजाळने 5 चौकारासह 77, शिसीर भवानी 1 षटकार 5 चौकारासह 59, अनिष भुषद 4 चौकारासह 28, साहील सारडा 5 चौकारासह 22, आदित्य पाटील 4 चौकारासह 19 तर सोमेश्वर एम ने नाबाद 16 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब तर्फे आकाश असलकरने 56 धावात 5, विजय पाटीलने 36 धावात 2, प्रथम मास्तमर्डीने 39 धावात 2, तर रोहित ढवळेने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाचा 34.5 षटकात सर्वबाद 152 धावात आटोपला. आकाश असलकरने 4 षटकार 2 चौकारासह 35, विजय पाटीलने 3 चौकारासह 28, तनिष्क नाईकने 5 चौकारासह 32 धावा केल्या. बीडीकेतर्फे हार्दिक ओझाने 23 धावात 4, फरान पी ने 16 धावात 3, दीपक नीलगेरीने 16 धावात 2 तर साहील सावडाने 1 गडी बाद केला.