ऑनलाईन टीम / बीड :
महाराष्टातील बीड – परळ महामार्गावर वडवणीकडून बीडकडे येणार्या रिक्षाला ट्रकने जोराची धडक दिल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी घडली. बीड-परळी रस्त्यांवर पांगरबावडी येथे हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असून ते सर्व बीड शहरातील शाहुनगरमधील रहिवासी आहेत. बीड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडवणी येथून प्रवाशी रिक्षा बीडकडे प्रवाशी घेवून येत होता. रिक्षा पांगरबावडी जवळ आल्यानंतर बीडकडून वडवणीकडे जाणार्या ट्रक (क्र.एन. एच. 09 सी.व्ही. 9644) ने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झाले.
या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेत जखमींना नागरिकांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, याच ट्रकचालकाने घोडका राजूरी येथे आणखी एका दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जखमी झाल्याचे सांगितले जाते.
तबसुम अकबर पठाण, सारो सत्तार पठाण, रिहाण अबजान पठाण (वय 13), तम्मना अबजान पठाण (वय 10) मदिना पठाण यांचा या अपघात मृत्यू झाला आहे.