फीनिक्स मास्टर्स लीग क्रिकेट स्पर्धा : अमित पाटील सामनावीर
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित फीनिक्स मास्टर्स लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बीसीसी मच्छे संघाने एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाचा 2 गडय़ाने पराभव करून दोन गुण मिळविले. 39 धावा करणाऱया अमित पाटीलला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर आयोजित या स्पर्धेत पावसामुळे सकाळच्या सत्रातील पहिला सामना रद्द करण्यात आला. दुसऱया सामन्यात एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्वबाद 140 धावा केल्या. जयंत जाधवने 1 षटकार 3 चौकारासह 41, जावेद मुदीनूरने 2 चौकारासह 32, महावीर संगोडीने 1 षटकार 1 चौकारासह 19 तर मिलिंद बेळगावकरने 16 धावा केल्या. बीसीसी मच्छेतर्फे मनोज पाटीलने 18 धावात 4, प्रवीण कुऱहाडेने 13 धावात 2, मनोज ताशिलदारने 23 धावात 2, तर प्रसाद नाकाडीने 34 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बीसीसी मच्छे संघाने 20 षटकात 8 बाद 141 धावा करून सामना 2 गडय़ाने जिंकला. अमित पाटीलने 1 षटकार 1 चौकारासह 39, विनित अडुरकरने 1 षटकार 1 चौकाराह नाबाद 24, प्रसाद नाकाडीने 1 षटकार 1 चौकारासह 13, तर प्रवीण कुऱहाडेने 1 षटकार 1 चौकारासह 12 धावा
केल्या.
एक्स्ट्रीम स्पोर्ट्सतर्फे सचिन कलवारने 16 धावात 2, वीरेश गौडरने 25 धावात 2, सागर गौरगोंडा व मिलिंद बेळगावकर यानी प्रत्येकी एक गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे फिनिक्स एव्हीएशनच्या अलिशा नायर, शाहीन मुजावर, ओंकार बेनके आदी मान्यवरांच्या हस्ते सामनावीर अमित पाटील, इम्पॅक्ट खेळाडू मनोज पाटील, उत्कृ÷ झेल महावीर संगोळी, सर्वाधिक षटकार जयंत जाधव यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
गुरुवारचे सामने
विश्रुत स्ट्रायकर्स वि. ऍडव्होकेट पाटील लायन्स सकाळी 9 वा.,
के आर. शेट्टी किंग्स वि. फॅन्को क्रिकेट क्लब दुपारी 1 वा.