ऑनलाईन टीम / बुलडाणा :
बुलडाणा जिह्यातील देऊळगाव राजा बायपास मार्गावर भीषण अपघात झाला आहे. यवतमाळ बस डेपोची एक बस आज सकाळी औरंगाबादकडे निघाली होती. दरम्यान, ट्रक आणि बसमध्ये धडक झाल्याने हा अपघात घडला. या अपघात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून 18 प्रवासी गंभीर जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा बायपास मार्गावर दुपारी 1 वाजता ट्रक आणि बसमध्ये हा अपघात झाला. या बसमध्ये जवळपास 25 प्रवासी बसले होते. या अपघातात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली तर बसमधील 18 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताचा आवाजही मोठा आला. हा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. तसेच महामार्गाने जाणारे अनेकजण घटनास्थळी थांबले.
दरम्यान, स्थानिक गावकऱयांनी बचाव कार्य सुरु केले असून जखमी लोकांना तातडीने जवळील रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहे. या अपघातात बसचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून काही लोकांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला दिली आहे.