बॅकांची डोळेझाक, एटीएममध्ये ना सुरक्षारक्षक ना सॅनिटायझर
प्रतिनिधी / रत्नागिरी
कोरोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी शासनाने नियमावली आखून दिली आह़े या नियमावलीचे बँकामध्ये प्रालन केले जात आह़े. मात्र याच बँकांना एटीएम कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करण्याचा विसर पडला आह़े. तालुक्यामध्ये सुमारे 100 एटीएम आहेत़. यातील काही एटीएम वगळता बहुसंख्य एटीएममध्ये सुरक्षा गार्डची व्यवस्था नाहीच शिवाय कोरोना विषयी कुठलीही उप्राययोजना केलेली दिसत नाह़ी . जिल्ह्यात काही दिवसाप्रासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आह़े.
जिल्ह्यात गुरुवार पर्यंत 309जणांचा कोरेनामुळे मृत्यू झाला आह़े तर कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8 हजार 271 इतकी झाली आह़े बँकाच्या एटीएममध्ये कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याचे शासनाचे निर्देश असताना देखील याकडे बँका डोळेझाक करताना दिसून येत आह़े एटीएमच्या की-प्रॅडवर दररोज शेकडो लोकांचा स्प्रर्श होत असत़ो. काही ठराविक बँकाची काही एटीएम सोडल्यास कुठेही सुरक्षा रक्षक नसल्याचे दिसून येत आह़े तसेच काही बँक एटीएममध्ये सॅनिटायझरचा वाप्रर होत नसल्याचे निदर्शनास येत आह़े. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आह़े. मात्र बॅकामधील अश्या प्रकारच्या बेजबाबदारीमुळे कोरोनाचा संर्सगाचा धोका आह़े. काही एटीएममध्ये रोज स्वच्छता तर नसतेच शिवाय रोकडदेखील नसल्याच्या तकारीचा सुर नागरीकांमधून उमटत आह़े.
-दररोज काढली जाणारी रक्कम 3,00,000
-दर महीन्याला काढली जाणारी रक्कम 1 कोटी
-1500-1800 प्रत्येक दिवशी पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या व्यक्ती
कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाचे निर्देश आहेत़ त्या सूचनांचे काटेकोर प्रालन करावे, एटीएममधून आल्यावर हात सॅनिटायझरने निजर्तुक करावे, नेहमी मास्क वाप्रराव़ा – ड़ॉ संदीप्र सुर्वे, रत्नागिरी