बेंगळूर /प्रतिनिधी
राज्यात कोरोना वाढीचे मीटर सुरूच आहे. राजधानी बेंगळूरमध्येही बाधितांची संख्या वाढतच आहे. बेंगळूरमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाखांच्या पुढे गेली आहे.
शुक्रवारी कर्नाटकात ७,५७१ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यापैकी २,९४८ रुग्ण बेंगळूरमध्ये सापडले आहे. त्यामुळे बेंगळूर शहरी जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या १,०२,७७० वर पोहोचली आहे. यातील ६६,६०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ३४,५३२ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यँत १६३५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात एकूण रूग्णांची संख्या २,६४,५४६ वर पोहोचली आहे. यापैकी १,७६,९४२ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला असून ८३,०६६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी राज्यातील रुग्णालयातून ६,५६१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण ४,५२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी एकूण ३४,६३१ आरटी-पीसीआर आणि २२,९९२ जलद प्रतिजैविक चाचण्या घेण्यात आल्या. म्हणजेच, एका दिवसात एकूण 57,623 रुग्णांची तपासणी केली आहे. आतापर्यंत एकूण २३,१४,४८५ लोकांची तपासणी झाली आहे.