बेंगळूर : बेंगळूरमध्ये ऑक्सिजन सिलिंडरची उपलब्धता 10 पट वाढविण्याची सूचना मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिली आहे. शिवाय बेंगळूरमधील इस्पितळांच्या आवारात मेक शिफ्ट इस्पितळ अस्तित्वात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री डॉ. सुधाकर यांनी दिली. बेंगळूरमध्ये ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. त्यामुळे आगामी दिवसांत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आणि बेडची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. रेमडेसिवीरचा सातत्याने पुरवठा होत आहे. केंद्र सरकारने अतिरिक्त 25 हजार वायल पुरविण्यास संमती दर्शविली आहे. बायोकॉनच्या प्रमुख किरण मुझुमदार शा यांच्याशी चर्चा करण्यात आली असून दहा दिवसांत रेमडेसिवीरचे 10 हजार वायल पुरविणार आहेत. या महिन्यातच 50-60 हजार वायल पुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, असे ते म्हणाले.
Previous Articleमुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत
Next Article कोरोना चाचणी प्रमाणपत्राची सक्ती नको
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.