बेंगळूर/प्रतिनिधी
शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रक्रियेत गुंतलेले तब्बल ८१६ स्वच्छता कामगार, पर्यवेक्षक, चालक आणि मदतनीसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती बेंगळूर महापालिकेने बुधवारी कर्नाटक उच्च न्यायालयात दिली.
शहरातील साथीच्या व्यवस्थापनासंबंधीच्या जनहित याचिकांच्या सुनावणीदरम्यान, बीबीएमपीने सादर केलेल्या आकडेवारीत असे दिसून आले आहे की त्यातील ४२३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, ३४१ जणांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले गेले आहे तर ५२ जण घरात अलिप्त आहेत.
प्रथमदर्शी कामगारांच्या ११,९०२ रॅपिड अँटीजेन टेस्ट आणि ३,८७२ आरटी-पीसीआर चाचण्या घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती बीबीएमपी प्रशासनाने दिली.