बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर सेंट्रल क्राइम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यादरम्यान क्रिकेट सट्टेबाजीविरूद्ध कारवाई करताना २५ गुन्हे दाखल केले आहेत आणि ४२ आरोपींना अटक केली आहे.
सट्टेबाजी केंद्रांवर छापे टाकताना पोलिसांनी १.५४ कोटी रुपये जप्त केले आहेत. गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल दरम्यान क्रिकेट सामन्यांवर होणाऱ्या सट्टेबाजीविरूद्ध करण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये एकूण २५ गुन्हे दाखल करण्यात आले, तर ४२ आरोपींना अटक केली आणि १ कोटी ५४ लाखांची रोकड जप्त केली असल्याची माहिती दिली.
बुधवारी पोलिसांनी व्हॉट्स अॅपवरून सट्टेबाजीत गुंतलेल्या एका व्यक्तीला अटक केली होती आणि सट्टेबाजीसाठी वापरलेले १५ लाख रुपये जप्त केले होते.