बेंगळूर/प्रतिनिधी
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यांवर बेकायदेशीर सट्टेबाजी केल्याप्रकरणी बेंगळूर सेंट्रल क्राइम ब्रँच (सीसीबी) पोलिसांनी बुधवारी एकास अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून ३०.५ लाख रुपये आणि दोन सेल फोन जप्त करण्यात आले आहेत. सीसीबीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
१७ ऑक्टोबर रोजी, बेंगळुरू पोलिसांनी आयपीएलमधील सुरु असलेल्या सामन्यांवर बेकायदेशीर सट्टेबाजी करीत असलेल्या चार ठिकाणी छापा टाकला आणि कारवाईत एकूण २१ लाख रुपये जप्त केले होते.