बेंगळूर/प्रतिनिधी
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तामिळनाडू आणि कर्नाटक येथून दोघांना इस्लामिक स्टेट (आयएस) साठी भरती आणि सीरियाला जाण्यासाठी पैसे पुरवल्याबद्दल अटक केली आहे.
तामिळनाडूमधील रामनाथपुरम येथील ४० वर्षीय अहमद अब्दुल आणि ३३ वर्षीय इरफान नासिर या दोघांना एनआयएने अटक केली आहे. त्यांची नावे इस्लामिक स्टेटशी संबंधित प्रकरणात चौकशी दरम्यान उघडकीस आली. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अहमद अब्दुल हा चेन्नईतील एका बँकेत व्यवसाय विश्लेषक आहे तर बेंगळूर येथे राहणारा इरफान नासिर तांदूळ व्यापारी आहे. एनआयएने १९ सप्टेंबर रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता आणि त्याला “बेंगळूर -इसिस मॉड्यूल” म्हटले आहे. ‘