बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात सर्व परीक्षा स्थगित असताना राज्याच्या सार्वजनिक शिक्षण विभागाने (डीपीआय) विभागाची परवानगी न घेता २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी वर्ग घेतल्याबद्दल खासगी विनाअनुदानित शाळांना नोटिसा बजावल्या आहेत.
कर्नाटक खाजगी शाळांच्या पालक संघटना समन्वय समितीने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नऊ शाळांनी विभागाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
महालक्ष्मीपूरम आणि राजाजीनगर येथे असलेल्या श्री चैतन्य टेक्नो स्कूलला या नोटिसा दिल्या आहेत. विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना तीन दिवसांत नोटिसाला उत्तर देण्यास सांगितले आहे.