बेंगळूर/प्रतिनिधी
होसकेरेहळ्ळी आणि शहरातील आसपासच्या भागात मुसळधार पावसाने नुकसान झाले होते. दरम्यान दक्षिण लोकसभेचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी या भागातील सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांची पाहणी केली. गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले होते.
खासदार सूर्या यांनी होसकेरेहळ्ळी आणि बेंगळूर दक्षिण मधील इतर सखल भागांमध्ये कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लक्ष केंद्रित केले जाणे आवश्यक आहे. दरम्यान एजन्सींमध्ये समन्वय आणि भागधारक – नागरिकांचा सहभाग असणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले.