बेंगळूर /प्रतिनिधी
बेंगळूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच एक धक्कादायक बाब म्हणजे बेंगळुरू पोलीस दलातील २१ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. बेंगळूरमध्ये पोलिसांना कोरोना होण्याचे प्रमाण वाढत आहे. सोमवार आणि मंगळवारी संध्याकाळी सुमारे २१ जणांना कोरोना झाल्याचे अहवाल प्राप्त झाले.
कोरोना बाधितांमध्ये एच.ए.एल. पोलिस ठाण्यातील एक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक, चार हेड कॉन्स्टेबल, एक महिला हेड कॉन्स्टेबल आणि इतर सात जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे मंगळवारी पोलीस स्थानक सील केले गेले.
तसेच सदाशिवनगर पोलीस स्थानकातील एक हवालदार आणि जे.जे.नगर येथील ५९ वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षकाला कोरोना संसर्ग झाला आहे. तसेच, येलाहंका न्यू टाऊन, चंद्र लेआउट, एचएसआर लेआउट वाहतूक पोलिस स्टेशन आणि मायको लेआऊट पोलिस स्थानकातील पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुन्हा पोलिसांच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित होत आहे.