बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर मेट्रोने मेट्रोच्या ‘वार्षिक’ स्मार्ट कार्डची वैधता एका वर्षापासून दहा वर्षांपर्यंत वाढविली आहे. बेंगळूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीएमआरसीएल) एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे साथीचा रोग सर्वत्र असल्याने मेट्रो सेवा काही महिन्यासाठी बंद ठेवण्यात आली होती. या कालावधीत, काही प्रवाश्यांनी यांचा वापर करू शकले नाहीत. स्मार्ट कार्डची वैधता कालबाह्य झाल्यामुळे समस्या उद्भवत आहेत त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे म्हंटले आहे..
प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बीएमआरसीएलने सर्व जारी केलेल्या स्मार्ट कार्ड्सची वैधता कालावधी वाढवून एक वर्षासाठी ठेवली होती, जी शेवटच्या टॉप-अपपासून १० वर्षांपर्यंत म्हणजेच १९ सप्टेंबर २०३० पर्यंत वाढविण्यात आली आहे.
बीएमआरसीएलने प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली अट देखील काढून टाकली ज्यांना एका वर्षासाठी २० रुपये भरल्यानंतर कार्ड पुन्हा चालू करण्याची आवश्यकता आहे. बीएमआरसीएलने वेबसाइट आणि मेट्रो नेट बॅंकिंगद्वारे कार्ड रिचार्जचा पर्याय देखील दिला आहे.