बेंगळूर /प्रतिनिधी
बेंगळूर गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. एका आठवड्यानंतर बेंगळूरमध्ये ३ नोव्हेंबरपर्यंत हलक्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वानुमानानुसार ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० पर्यंत बेंगळूर शहर, बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, एचएएल विमानतळ आणि हेब्बळ जीकेव्हीके भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान तापमान १९ ते ३० डिग्री सेल्सिअस राहील, असे अहवालात नमूद केले आहे.