बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यासह राजधानीत कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ब्रुह बेंगळूर महानगर पालिकेने (बीबीएमपी) मंगळवारी शहरातील सार्वजनिक प्रभागांमध्ये विनामूल्य कोरोना चाचणी करण्याची घोषणा केली.
बीबीएमपी आयुक्त एन. मंजुनाथा प्रसाद यांनी कोरोना व्हायरसचे लवकर निदान झाल्यास त्याची लागण इतरांना होण्यापासून रोखण्यास मदत होणार आहे. असे त्यांनी म्हंटले आहे.
आयुक्त मंजुनाथ यांनी नागरिकांना चाचणीची चिंता करण्याची गरज नाही, लोकांना पुढे येण्यास प्रोत्साहित करा. प्रारंभिक टप्प्यात चाचणी करून घेणारे बहुतेक लोक खूप वेगाने बरे होतात,” असे त्यांनी निवेदनात म्हंटल आहे.
सोमवारी जाहीर झालेल्या कोविड -१९ वॉर रूमच्या आकडेवारीनुसार, बीबीएमपीच्या हद्दीत एकूण २७७२६१ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.