वार्ताहर/ हिंडलगा
हिंडलगा येथे बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरून बेकायदेशीरीत्या होत असलेली गाय आणि वासरांची वाहतूक शनिवारी दुपारी हिंदू संघटनेच्या जागरुक कार्यकर्त्यांनी रोखली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाची चांगलीच कानउघाडणी करून एक गाय व आठ वासरांना सुरक्षितरीत्या गोशाळेत पाठवून दिले.
यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे उत्तर कर्नाटक प्रमुख रविकुमार कोकितकर, नारू निलजकर, विकास चव्हाण, करण पाटील, सचिन भादवणकर, महादेव पाटील, साईनाथ पाटील, विनोद हंगिरगेकर, सचिन तुप्पट यांच्यासह बजरंग दल, श्रीरामसेना व हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यामुळे हिंडलगा परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.