मालवण/प्रतिनिधी-
मालवणसमोर २० वाव खोल समुद्रात केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारीप्रश्नी पारंपरिक मच्छीमार आक्रमक झाले होते. पारंपरिक मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सकाळी येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयात जाऊन बेकायदेशीर एलईडी पर्ससीन नौकांवर कारवाई का होत नाही याविषयी विचारणा केली. मच्छीमार आक्रमक झाले असल्याची खबर मिळताच पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर घटनास्थळी दाखल झाले होते.