प्रतिनिधी/ बेळगाव
वासूदेव आला हो! वासूदेव आला सकाळच्या पहारी वासुदेव आला असे म्हणत ग्रामीण भागातील गावो-गावी पहाटेच्यावेळी वासूदेव फिरताना दिसत आहे. डोक्मयावर मोरपिसांची टोपी, अंगात पांढराशुभ्र झब्बा, कंबरेला बांधलेला शेला, काखेला झोळी, गळय़ात कवडय़ांची माळ, कपाळावर गंधाचे टिळे, हातात चिपळय़ा आणि मुखात भगवंताचे नाम घेत तालुक्याच्या पश्चिम भागातील गावो-गावी भल्या पहाटेच्यावेळी वासूदेवचा मधूर स्वर नागरिकांच्या कानावर पडत आहे.
ग्रामीण भागात सुगी हंगाम संपल्यानंतर हेळवी, गारूडी, नंदीबैल व वासुदेव दाखल होतात. सध्या पश्चिम भागातील उचगाव, कोनेवाडी, तुरमुरी, बाची, कुदेमानी, बसुर्ते, कल्लेहोळ, अतिवाड, बेकिनकेरे आदी भागात पहाटच्यावेळी नागरिकांना वासुदेवाची स्वारी अनुभवायला मिळत आहे. पहाटेच्यावेळी वासुदेवाचे स्वर कानावर पडताच बालचमू देखील उडून वासूदेवाला पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. वासुदेव घरोसमोर येताना घरीतील मंडळींही वासुदेवाचे दर्शन घेऊन पायावर नतमस्तक होताना दिसत आहेत. शिवाय घरातील महिलांकडून वासूदेवला धान्य दिले जात आहे.