इराणच्या मानवाधिकार अधिवक्त्याचाही गौरव
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
बेलारुसमधील विरोधी पक्षाचा नेता आणि मानवाधिकार कार्यकर्ता, तुरुंगात कैद इराणी मानवाधिकार अधिवक्ता आणि निकाराग्वा तसेच अमेरिकेच्या दोन कार्यकर्त्यांना संयुक्तपणे ‘राइट लाइव्लीहुड’ पुरस्कार गुरुवारी देण्यात आला आहे. या पुरस्काराला पर्यायी नोबेलही म्हटले जाते. जगभरात लोकशाहीसाठी धोके वाढत चालले आहेत. लोकशाहीचे समर्थन करणाऱयांनी पुढे येऊन परस्परांना साथ देण्याची वेळ आली असल्याचे स्वीडिशन राइट लाइव्लीहुड फौंडेशनचे प्रमुख ओले वोन उक्सकल यांनी म्हटले आहे.
58 वर्षीय मानवाधिकार कार्यकर्त्या एलेस बिलिस्की आणि त्यांची स्वयंसेवी संस्था ‘ह्युमन राइट्स सेंटर विआस्ना’ला बेलारुसमधील लोकशाही आणि मानवाधिकारासाठी लढा दिल्याने फौंडेशनने हा पुरस्कार दिला आहे. बिलिस्की यांनी 2012 मध्ये नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
इराणमधील कार्यकर्ते, विरोधी पक्षांचे नेते आणि नकाब न परिधान केल्याप्रकरणी खटल्याला तोंड देणाऱया महिलांच्या बाजूने न्यायालयात लढणाऱया अधिवक्त्या नसरीन सोतोदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तुरुंगात चांगली स्थिती आणि महामारीदरम्यान राजकीय कैद्यांच्या सुटकेच्या मागणीवरून उपोषणास बसलेल्या 58 वर्षीय सोतेदे यांनी अलिकडेच एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिल्टन, डेलावर येथे जन्मलेले अमेरिकन मानवाधिकार अधिवक्ते ब्रियन स्टिवेंसन आणि निकाराग्वाच्या 61 वर्षीय पर्यावरण कार्यकर्त्या लोट्टे कनिंगम यांचीही संयुक्तपणे या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.