प्रतिनिधी /बेळगाव
वन विभागाचे उप वनसंरक्षणाधिकारी व्ही. अमरनाथ हे 1 जुलै रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी सध्या कोप्पळ येथे कार्यरत असणारे जी. पी. हर्षा भानू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी ते आपला पदभार स्वीकारणार आहेत. यापूर्वी त्यांनी सतीश जारकीहोळी वनमंत्री असताना त्यांचे सचिव म्हणून काम केले आहे.