बेळगाव : बेंगळूर येथे टीसीसी महिला चॅम्पियन क्रिकेट स्पर्धेत केआयओसी संघाने विजापूर संघाचा 177 धावानी पराभव केला. बेळगावच्या श्रेया पोटेने 45 धावात 3 गडी बाद केले आहेत.
अल्ट्रा स्पोर्ट्स ग्रीन पार्क कोडती, बेंगळूर येथील मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात केआयओसी महिला संघाने 29 षटकात 6 बाद 227 धावा केल्या. त्याला उत्तर देताना विजापूर संघाचा डाव 24 षटकात सर्वबाद 50 धावात आटोपला. बेळगावच्या श्रेया पोटेने अचूक गोलंदाजी करत 6 षटकात 45 धावा देऊन 3 गडी बाद केले. 12 वषीय श्रेयाने वरि÷ महिला संघात चांगली कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे.