उपाध्यक्षपदी महादेवी खनगौडर
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव एपीएमसीच्या अध्यक्षपदी उचगावचे काँग्रेसचे कार्यकर्ते युवराज कदम तर उपाध्यक्षपदी हुदलीच्या महादेवी खनगौडर यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोमवारी सकाळी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी तहसीलदार कुलकर्णी यांनी ही घोषणा केली. अध्यक्षपदासाठी भाजपकडून रेणुका पाटील, काँग्रेसकडून लगमाना नायक, युवराज कदम, संजीव मदार, म. ए. समिती कडून महेश जुवेकर यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या महादेवी खनगौडर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवले होते.