प्रतिनिधी/बेळगाव
रविवारी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटीनमध्ये जिल्हयातील आणखी 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अजमेर शरीफ दर्ग्याहून परतलेल्या 38 पैकी 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामुळे जिल्हयातील बाधितांची संख्या 107 वर पोहचली आहे.
निपाणी, संकेश्वर, चिक्कोडी, हुक्केरी तालुकयातील 38 जण बसमधून राजस्थानमधील अजमेर शरीफला गेले होते. 17 मार्च रोजी ते राजस्थानला गेले होते. 3 एपिल रोजी ते सर्वजण कोगनोळी तपास नाक्मयातून जिल्हयात प्रवेश केले. त्यांना तवंदी घाटातील मुराराजी देसाई निवासी शाळेत क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले होते. 38 पैकी 22 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
यामध्ये 13 महिलांचा समावेश आहे. 3 वर्षाची बालिका आणि 3 वर्षाचे बालक, 8 वर्षाची बालिका तसेच 6 वर्षांच्या बालकाचा समावेश असून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे. दोन दिवसापुर्वी हिरेबागेवाडी व कुडची येथील 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर रविवारी एका दिवसात आणखी 22 जणांचे अहवला पॉझिटिव्ह आले असून त्यामुळे संपुर्ण जिल्हयात खळबळ माजली आहे.