प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव येथील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 110 वर पोहोचली आहे. कुडची येथील 30 वषीय महिलेच्या संपर्कातून एका 23 वषीय तरूणाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर मुंबई प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या एका 23 वषीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सोमवारी दुपारी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. रविवारी सांयकाळपासून राज्यात 84 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यामुळे राज्यातील बाधितांची संख्या 1231 वर पोहोचली आहे. सोमवारी बेळगाव येथील ज्या दोन तरूणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सांयकाळपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या 65 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तर उर्वरित 52 जणांवर उपचार करण्यात येत आहे.