बेळगाव / प्रतिनिधी
हिरेबागेवाडी व संकेश्वर येथील आणखी चौदा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये सात महिला व सात पुरूषांचा समावेश आहे. जिल्ह्य़ातील एकूण बाधितांची संख्या 69 वर पोहोचली आहे. तर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 557 वर पोहोचली आहे.
गुरूवारी दुपारी राज्य आरोग्य विभागाने प्रसिध्द केलेल्या बुलेटिनमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. एका दिवसात राज्यातील 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये हिरेबागेवाडी येथील 11 व संकेश्वर येथील तिघा जणांचा समावेश आहे.
गुरूवारी दुपारच्या अहवालानंतर एका हिरेबागेवाडी येथील बाधितांची संख्या 36 वर पोहोचली आहे. यात सर्व चौदा जणांना बुधवारी रात्री उशीरा सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण विभागात दाखल करण्यात आले आहे.