24 तासांत 51 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : साडेपाच लाखांची स्वॅब तपासणी पूर्ण
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. चालू वषी प्रथमच इतक्मया मोठय़ा प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून गुरुवारी रुग्णसंख्येने अर्धशतक पार केले आहे. याच दिवशी साडेपाच लाखांची तपासणी पूर्ण झाली असून बेळगाव शहर व उपनगरांत 18 रुग्ण आढळून आले आहेत.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन विश्वेश्वरय्यानगर व आंबेडकरनगर-अनगोळ येथे महानगरपालिका व आरोग्य विभागाने बॅरिकेड्स उभे करून निर्बंधित प्रदेश जारी केले आहेत. एका सदाशिवनगरमध्ये (विश्वेश्वरय्यानगर) गुरुवारी सात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात खबरदारी वाढविण्यात आली आहे.
महानगरपालिकेचे अधिकारी डॉ. संजीव डुमगोळ व त्यांच्या सहकाऱयांनी या परिसरात भेट देऊन पाहणी केली आहे. उचगाव, कंग्राळी खुर्द, मुतगा, रामतीर्थनगर, वडगाव, माळी गल्ली, अंजनेयनगर, भाग्यनगर, टिळकवाडी, शिवाजी कॉलनी परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून रामदुर्ग तालुक्मयातील कोळची या एकाच गावात 20 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
रायबाग तालुक्मयातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 27 हजार 153 झाली असून 26 हजार 645 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली असून 140 बाधितांवर वेगवेगळय़ा इस्पितळांत उपचार करण्यात येत आहेत.
आतापर्यंत जिह्यातील 5 लाख 51 हजार 522 जणांची स्वॅब तपासणी कली असून 5 लाख 19 हजार 650 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 1751 जणांचे अहवाल यायचे आहेत. 18 हजार 679 हून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत. याबरोबरच अथणी, गोकाक तालुक्मयातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.