झारखंडवरुन परतलेल्यांना कोरोनाची बाधा
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना पॉझिटिव्हची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मंगळवारी झारखंडवरुन परतलेल्या 13 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता बाहेरुन आलेल्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे क्वारंटाईनमध्ये असलेल्यांमध्ये भितीचे वातावरण पसरु लागले आहे. अजूनही परराज्यातून नागरिक येत आहेत. त्यामुळे हा आकडा वाढणार आहे.
अथणी तालुक्मयातील सौदी, नंदगाव, झुंजरवाड या गावातील हे रुग्ण आहेत. देवदर्शनासाठी हे झारखंडला गेले होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते तेथेच अडकले. काही दिवसांपूर्वी ते अथणी तालुक्मयात दाखल झाले. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांचे स्वॅब प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आला होता. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभागाने अधिक दक्षता घेतली आहे. झारखंडहून आलेल्या सहा पुरुष तर सात महिलांचा समावेश यामध्ये आहे.