प्रतिनिधी /बेळगाव
चार्टर्ड अकौंटंट्स ऑफ इंडियाच्या बेळगाव शाखेतर्फे ‘चॅलेंजीस टू प्रोफेशन इन डिजिटल ईरा’ या विषयावर एकदिवशीय कार्यशाळा पार पडली. सीए अशोक परांजपे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. प्रारंभी चेअरमन राहुल अडके यांनी प्रास्ताविकात सीएचा पेशा कसा बदलत आहे, याबद्दल सविस्तर विवेचन केले.
अशोक परांजपे यांनी तंत्रज्ञान हे हा पेशा स्वीकारलेल्यांसाठी वरदान असून आपण त्याचा कसा उपयोग करून घेतो हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. हैदराबदचे सीए दयानिवास शर्मा, सीए प्रेमनाथ व बेंगळूरचे सीए आनंद यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. सीए ऋतुजा बंग व सीए अभिषेक पोरवाल यांनी सूत्रसंचालन केले. सीए एम. एस. तिगडी यांनी आभार मानले.