प्रतिनिधी /पणजी
आयपीएस पोलीस अधिकारी बॉस्को जॉर्ज यांनी तुरुंग महा निरीक्षक पदाचा काल ताबा घेतला आहे. प्रत्यक्ष कामाला त्यांनी सुरुवात केली असून, आपल्या कार्यकाळात तुरुंगात होणारे गैर प्रकार बंद करण्यासाठी प्रयत्न कराणार आहे. त्यासाठी प्रत्यक्षात तुरुंगात जाईन पहाणी करणार असल्याचेही बॉस्को जॉर्ज यांनी सांगितले.
गोव्यातील गुरुंग महानिरीक्षक पदी पहिल्यांदाच आपीएस पोलीस अधिकाऱयाची नियुक्ती झाली आहे. यापूर्व या पदावर नागरी सेवेतील अधिकाऱयांची नियुक्ती केली जात होती. बॉस्को जॉर्ज हे गोवा पोलीस खात्यात उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले होते, त्यांनी आपल्या कतृत्वाच्या जोरावर अधिक्षक पदापर्यंत मजल मारली इतकेच नव्हे तरी ते आपीएस अधिकारी बनले परप्रातांत सेवा बजावून पुन्हा त्यांची बदली ते गोवा पोलीस खात्यात आले.