विवाहाला काही तासांचा अवधी… तरीही वधू कर्तव्यावर हजर
बोरगावः एकीकडे कर्तव्य बजावत असतानाच आपल्या नववधू सहकार्याच्या हातावर मेहंदी काढताना बोरगाव पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी.
संभाजी चव्हाण / नागठाणे
विवाह…..वधू-वरांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा. लग्नग्न ठरल्यानंतर खरेदीची लगबग, पै-पाहुण्यांचा गराडा यामुळे एक उत्साही वातावरण तयार होते. लग्नाच्या काही दिवस अगोदरच लगीनघरात धावपळ सुरू होते. वधू-वरांची तर चांगलीच पळापळ असते. मात्र सध्या कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तास असलेल्या एका नववधूला लग्नग्नाला काही तासच उरले असतानाही कर्तव्यावर हजर राहावे लागले असल्याने पोलीस ठाण्यातच ‘मेहंदी रस्म’ करावी लागली. पोलीस ठाण्यातील इतर महिला सहकाऱयांनी हा कार्यक्रम कर्तव्य बजावत साजरा केला.
अश्विनी रमेश माने…. सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्यात सध्या महिला पोलीस म्हणून कार्यरत आहेत. मूळच्या वाठार किरोली (ता.कोरेगाव) येथील रहिवासी असणाऱया अश्विनी माने यांचा विवाह हिंगणगाव (ता.फलटण) येथे पार पडणार आहे. शुक्रवार 3 रोजी दुपारी 1.30 वाजता हा विवाह सोहळा होणार आहे. खरे तर विवाहासाठी त्यांना काही दिवसांपूर्वीच सुट्टीवर सोडणे आवश्यक होते. मात्र गेल्या दहा दिवसांपासून देशासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व पोलिसांच्या रजाही त्यामुळे रद्द करण्यात आल्या. यामुळे अश्विनी माने याना कर्तव्यावर हजर राहावे लागले.
आता लग्नग्नाला काही तासांचा अवधी राहिला असतानाही बुधवारी सकाळी त्या कर्तव्यावर हजर राहिल्या होत्या. खरे तर या वेळी त्यांनी घरी असणे अपेक्षित होते. त्यांनी सायंकाळी लग्नग्नासाठी रजेचा अर्जही सादर केला. खरे तर या वेळी नववधूने घरी राहून लग्नग्नाचे इतर विधी उरकणे गरजेचे होते. पण रात्री उशिरा कर्तव्यावरून घरी गेल्यानंतर हे शक्य होणार नसल्याचे बोरगाव पोलीस ठाण्यातील इतर महिला कर्मचाऱयांच्या लक्षात आल्याने त्यांनी बुधवारी रात्री एकीकडे आपले कर्तव्य बजावतच असतानाच दुसरीकडे नववधू अश्विनी मानेच्या हातावर मेहंदी काढण्यास सुरवात केली. या उपक्रमास पोलीस ठाण्यात पुरुष सहकाऱयानीही उत्स्फूर्तपणे दाद दिली.
गुरुवारी सकाळीही नववधू अश्विन माने या आपली रजा मंजूर करण्यासाठी बोरगाव पोलीस ठाण्यात उपस्थित होत्या. सपोनि चंद्रकांत माळी यांनी त्यांची रजा लगेचच मंजूरही केली. त्यांना किती दिवसांची रजा मिळाली याची माहिती मिळू शकली नाही.