ऑकलंड / वृत्तसंस्था
न्यूझीलंडचा जलद गोलंदाज टेंट बोल्ट व यष्टीरक्षक फलंदाज टॉम लॅथम हे माय देशातच होणार भारताविरुद्ध मालिकेत खेळू शकणार का, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. या दोघांनाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध अलीकडेच संपन्न झालेल्या कसोटी मालिकेत फ्रॅक्चर झाले. बोल्ट हा न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱया कसोटी सामन्यातून बाहेर फेकला गेला. मिशेल स्टार्कचा उसळता चेंडू ग्लोव्हजच्या वर आदळल्यानंतर त्याला जायबंदी व्हावे लागले.
प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी बोल्ट भारताविरुद्ध टी-ट्वेंटी मालिकेसाठी उपलब्ध असेल, असे सांगितले बोल्टला सध्या सक्तीची विश्रांती देण्यात आली असून या आठवडय़ाअखेरीस तो हलका सराव सुरु करु शकतो का, याची चाचपणी केली जाईल, असे त्यांनी पत्रकातून नमूद केले
27 वर्ष लॅथमच्या करंगळीला दुखापत झाली असून तो देखील काही दिवस खेळू शकणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱया व शेवटच्या कसोटी सामन्यात भारत लाबुशानेचाचा झेल घेताना त्याला दुखापत झाली होती.
न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत 0-3 अशा एकतर्फी फरकाने पराभूत झाला असून भारताविरुद्ध ते विजयाच्या ट्रकवर येण्याचा प्रयत्न करतील. भारत-न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 24 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ऑकलंड येथे उभय संघातील पहिली टी-20 होईल. त्यानंतर दोन्ही संघ तीन वनडे व दोन कसोटी सामने देखील खेळणार आहेत. न्यूझीलंडसाठी अलीकडे महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापतीचे सत्र सुरु झाले असून यामुळे साहजिकच त्यांच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. बोल्टपूर्वी लॉकी फर्ग्युसन व मॅट हेन्री हे सुद्धा दुखापतीमुळे संघातून बाहेर फेकले गेले आहेत.