ऑनलाईन टीम / ब्रासिलिया :
भारत बायोटेक या कंपनीने ‘कोवॅक्सिन’चे 2 कोटी डोस पुरवण्याचा ब्राझील सरकारशी करार केला होता. मात्र, क्लिनिकल ट्रायलमध्ये आलेल्या अडचणींमुळे ब्राझीलने हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला.
ब्राझीलच्या आरोग्य नियामकाने सांगितले की, ब्राझीलच्या औषध कंपन्या प्रेसिसा मेडिकॅमेन्टोस आणि एन्व्हिक्सिया फार्मास्युटिकल्स लिमिटेड यांनी भारत बायोटेकबरोबर नियामक सबमिशन्स, परवाने, वितरण, विमा आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल घेण्यासाठी करार केला होता. परंतु, अनेक मुद्द्यांवर सहमती न झाल्याने आणि क्लिनिकल चाचण्या अडकल्यानंतर हा करार रद्द करण्यात आला.