वृत्तसंस्था/ लॉस केबोस
ब्रिटनचा युवा टेनिसपटू कॅमेरून नोरीने एटीपी टूरवरील मेक्सिकोत झालेल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळविताना अमेरिकेच्या नेकासिमाचा पराभव केला.
मेक्सिकोतील झालेल्या मिफेल खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील पुरूष एकेरीच्या सामन्यात नोरीने नेकासिमाचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. एटीपी टूरवरील नोरीचे हे पहिले विजेतेपद आहे. नोरीने या स्पर्धेत अंतिम फेरीतपर्यंत एकही सेट गमविलेला नाही. या स्पर्धेत नोरीला 4 गुण मिळाले आहेत.