ऑनलाईन टीम / लंडन :
ब्रिटन चे पंतप्रधान बोरिस जॉन्सन गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी लढा देत आहेत. गेल्या काही आठवड्यांपूर्वी त्यांनी स्वतःहून आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती ट्विटर च्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर ते एकांतवासात होते. मात्र, अनेक दिवस होऊनही त्यांच्या प्रकृती मध्ये सुधारणा न झाल्याने त्यांना रविववारी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते.
दरम्यान, उपचार सुरू असताना जॉन्सन प्रकृती सोमवारी रात्री अधिक खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले आहे.
ब्रिटन चे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना 27 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली. त्यांनी स्वतः ही माहिती दिली होती. मात्र लक्षण कमी न होत असल्याने त्यांना सहा एप्रिल रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्यांच्या प्रकृती मध्ये बिघाड झाल्याने त्यांना आता अतिदक्षता विभागात उपचारासाठी नेण्यात आले आहे. जॉन्सन यांच्यावर सेंट थॉमस या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी पर्यंत ते पंतप्रधान पदाची सारी जबाबदारी पार पाडत होते. मात्र, त्यानंतर त्यांनी विदेश मंत्री डोमनिक रॉब यांची आपल्या जागी नियुक्ती केली.