ऑनलाईन टीम / लंडन :
ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन नुकतेच कोरोना आजारातून बरे झाले आहेत. त्यातच त्यांची जोडीदार कॅरी सायमंड्स यांनी लंडनमध्ये बुधवारी एका गोंडस मुलाला जन्म देऊन त्यांना आनंदाची बातमी दिली. बोरिस जॉन्सन यांनी आपल्या मुलाचे नाव त्यांच्यावर कोरोनाचे उपचार करणाऱ्या डॉक्टर वरून ठेवत त्या डॉक्टरांचे अशा अनोख्या पद्धतीने आभार मानले आहेत. अशी माहिती सायमड्स यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, विलफ्रड लॉरी निकोलस जॉन्सन असे या मुलाचे नाव ठेवण्यात आले आहे. जॉन्सन यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव निकोलस असे आहे. त्यावरून हे नाव ठेवण्यात आले आहे. निक प्रिन्स आणि निक हार्ट असं जॉन्सन यांच्यावर उपचार केले.
सायमड्स यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, विलफ्रड हे बोरिस यांच्या आजोबांचे नाव आहे. लॉरी हे माझ्या आजोबांचे नाव आहे. तर निकोलस हे निक प्रिन्स आणि निक हार्ट या डॉक्टरांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. असे स्पष्टीकरण सायमड्स यांनी दिले आहे.