निसर्ग शाळेत मुलांना पाठवत आहेत पालक
6 वर्षीय आलिया आणि तिची बहिण हानाने उत्तर लंडनच्या नेचर आफ्टर स्कूल क्लबमध्ये दीर्घकाळानंतर निसर्गाशी जोडले जाण्याचा अनुभव घेतला आहे. दोघीही मातीमध्ये खेळल्या, किटकांविषयी माहिती जाणून घेतली, कॅम्पफायरचा आनंद घेतला. महामारीमध्ये पहिल्यांदाच त्या गॅजेट्सपासून दूर झाल्या. त्यांच्यासाररखी हजारो ब्रिटिश मुले महामारीमुळे फॉरैसट स्कुल्ससोबत जोडली गेली आहेत.
ब्रिटनच्या फॉरेस्ट स्कूल असोसिएशनच्या (एफएसए) सर्वेक्षणानुसार सद्यकाळात फॉरेस्ट शाळांमध्ये प्रवेश वेगाने वाढले आहेत. लोकांमध्ये तणाव आणि चिंतेमुळे नैसर्गिक वातावरणावरून जागरुकता वाढली आहे. याचबरोबर कोरोना विषयक सुरक्षा, होम स्कुलिंगमुळे वाढता असंतोष ही देखील मुख्य कारणे आहे.
फॉरेस्ट स्कुल्सकरता इतकी विचारणा कधीच झाली नव्हती. त्यांची मागणी सातत्योन वाढत आहे, कारण आता देशभरातील शाळा ‘नेचर’ सेशन्सचे आयोजत करत आहेत. मुलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य, त्यांचे वर्तन आणि शिक्षणातील प्रगतीसह कोरोनाप्रूफ असल्याने हवा ट्रेंड वाढतोय. गावांमध्ये लहानाचे मोठे झालेले लोक याचे महत्त्व पूर्वीपासून ओळखून आहेत, याचमुळे मुलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी ते उत्सुक होते असे उद्गार एफएसएचे सीईओ गॅरेथ डेव्हिस यांनी काढले आहेत. मुलांना सामाजिक, भावनात्मक आणि शारीरिक कौशल्ये शिकविण्यासाठी शाळा वेगाने फॉरेस्ट स्कुल्सच्या दिशेने वळू लागल्या आहेत.
एकही गॅजेट नाही
या शाळा मुलांना तंत्रज्ञानापासून दूर नेतात. येथे येऊ मुलांच्या कल्पनांना भरारी मिळते. येथे नुकसान पोहोचविणारे एकही गॅझेट नसते. महामारी ही निसर्गाशी जोडले जाण्याची मोठी संधी होती असे उद्गार डेवोन येथील चिल्ड्रन ऑफ द फॉरेस्टचे लुइस एम्स यांनी काढले आहेत.