लान्सेट नियतकालीकाच्या प्रमुखांचा दावा, सर्व टप्प्यांच्या चाचण्या यशस्वी, जगात कोरोनाबाधितांची संख्या 1.45 कोटींवर
ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोनावर शोधलेल्या लसीच्या सर्व टप्प्यांमधील चाचण्या पूर्ण झाल्या असून ही घोषणा येत्या 48 तासांत केव्हाही होऊ शकते, असा दावा लान्सेट या विज्ञानविषयक नियतकालिकाने केला आहे. जुलैअखेर आपल्या लसीची घोषणा करण्यात येईल, असे ऑक्सफोर्ड विद्यापीठानेही एक महिन्यापूर्वी सांगितले होते. यामुळे जगभरात उत्साहाचे वातावरण असून आशेचा किरण स्पष्ट दिसू लागल्याचे मत व्यक्त होत आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठनिर्मित या लसीच्या मानवी चाचण्या एप्रिलच्या अखेरच्या आठवडय़ात सुरू झाल्या होत्या. ही लस ऍस्ट्राझेनेका या कंपनीच्या सहकार्याने विकसित केली जात आहे. 30 एप्रिल या दिवशी या सहकार्याची घोषणा करण्यात आली होती. अमेरिकेच्या ‘मॉडर्ना’ या कंपनीची लसही आता अंतिम टप्प्यात असून तिची घोषणाही चार दिवसांत होण्याची शक्मयता आहे.
ऑक्सफर्डची आघाडी
जगभरात सध्या तीनशेहून अधिक खासगी आणि सरकारी कंपन्या कोरोनाविरुद्ध लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. तथापि, सध्या तरी या सर्वांमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने आघाडी घेतलेली दिसून येत आहे. कोरोनाचा धोका समोर आल्यानंतर त्वरितच या विद्यापीठाने लसीचे प्रयोग सुरू केले होते. ते आता फलद्रुप होताना दिसत असून अंतिम टप्प्याच्या यशाच्या घोषणेवर साऱयांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
सविस्तर माहिती नाही
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीसंबंधी सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, अंतिम टप्प्यातील स्पृहणीय यशाबद्दल सांगण्यात आले आहे. लसीची सविस्तर माहिती तिचे उत्पादन सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होण्याची शक्मयता आहे.
‘सिरम’मध्ये उत्पादन
भारतातील सिरम या जैवतांत्रिक कंपनीमध्ये ऑक्सफर्डच्या लसीचे उत्पादन होणे शक्मय आहे. प्रारंभी तशी घोषणा करण्यात आली होती. तसे झाल्यास ही लस भारतीयांनाही त्वरित आणि परवडणाऱया दरात उपलब्ध होऊ शकते, अशी आशा निर्माण झाली आहे. भारताच्याही सात कंपन्या लस निर्माण करण्याच्या कार्यात जीव तोडून प्रयत्नशील आहेत. याशिवाय चीन, रशिया आणि फ्रान्समध्येही प्रयोग सुरू आहेत.
रशियातील धनिकांना आधीच लस?
रशियामधील काही धनिक आणि उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱयांना कोरोना लसीचे डोस अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच देण्यात आले आहेत, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ब्रिटनने काही दिवसांपूर्वी रशियावर आपल्या लसीचे तंत्रज्ञान चोरल्याचा आरोप केला होता. आता हा आरोप नव्याने केला जाण्याची शक्मयता आहे. रशियाने या वृत्ताचा इन्कार केला असला तरी जगभरात चर्चेला विषय मात्र मिळाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा सावध इशारा
कॅनबेरा : कोरोनाचे संकट आणखी अनेक आठवडे किंवा अनेक महिनेही टिकून राहू शकते, असा सावधगिरीचा इशारा ऑस्ट्रेलियाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी पॉल केली यांनी दिला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या मार्गावर असून त्यासाठी प्रशासन आणि सर्वसामान्य जनतेनेही सज्ज राहिले पाहिजे. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतात कोरोनाचा उदेक विशेषत्वाने असून तेथे जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण दलांनी देशभरातून माहिती घेण्यास सुरुवात केली असून महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रत्येकाच्या औष्णिक चाचण्या घेण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.
चिलीत रुग्णसंख्येत घट
सांतियागो : दक्षिण आफ्रिकेतील देश चिली येथे गेल्या आठवडाभरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे या देशाच्या प्रशासनाने लॉकडाऊनच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन उठविण्याची योजना पाच टप्प्यांमध्ये लागू करण्यात येणार असून ाकाही बाजारपेठा खुल्या करण्यात येणार आहेत.. अद्यापही या देशात संपूर्ण विलगीकरणाचा नियम कठोरपणे अंमलात आणण्यात येत असून पुढील दोन आठवडय़ात अटी शिथिल करण्याचा प्रारंभ करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
चीनमध्ये पुन्हा फैलाव
चीनच्या वायव्येस असणाऱया झिनजियांग प्रांतात कोरोनाचा अधिक वेगाने फैलाव होत असून काश्गर या इतिहासप्रसिद्ध शहरामध्येही आता रुग्ण आढळून येत आहेत. उरुमकी या शहरात आधीच कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सावध झाले असून अन्य शहरांमध्ये फैलाव होऊ नये यासाठी अंतर्गत वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्याची तयारी करण्यात येत आहे. एक आठवडय़ात फैलाव आटोक्मयात न आल्यास लॉकडाऊनची घोषणा शक्मय आहे.
साल्वादोरचा विलंब
सॅन साल्वादोर : एल साल्वादोर या देशाकडून लॉकडाऊन हटविण्याचा दुसरा टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे. गेल्या आठवडय़ात देशात पाचशेहून अधिक रुग्ण नव्याने आढळल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे येथील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. तज्ञ डॉक्टरांशी आणि संशोधकांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेतला जाईल. या देशातील एकूण रुग्णसंख्या 11 हजार 846 असून 335 मृत्यू आतापर्यंत झाले आहेत. देशातील 1 टक्का जनतेला कोरोना संसर्गाची शक्मयता असल्याचे तेथील प्रशासनाने म्हटले आहे.
फ्लोरिडात कोरोनाचा कहर
वॉशिंग्टन : अमेरिकेचा प्रांत असणाऱया फ्लोरिडामध्ये शनिवार ते रविवार या कालावधीत 12 हजार नवे रुग्ण आढळून आल्याने स्थानिक प्रशासनाची धावपळ होत आहे. प्रतिदिन 10 हजारहून अधिक नवे रुग्ण सापडणारा हा अमेरिकेतील पाचवा प्रांत आहे. न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत, असे सांगण्यात आले. अमेरिकेत प्रतिदिन सरासरी 40 हजार नवे रुग्ण आढळत आहेत. तरीही बहुतेक सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यास स्थानिक जनतेचाच कडवा विरोध आहे. त्यामुळे प्रशासनाची कोंडी होत आहे.
अर्थव्यवस्था समाधानकारक
ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडची अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा अधिक सुदृढ असून कोरोनाचा परिणाम आता हळूहळू निवळू लागला आहे, अशी ग्वाही त्या देशाचे अर्थमंत्री ग्रँट रॉबर्टसन यांनी दिली आहे. न्यूझीलंडमधील सर्व निर्बंध हटविण्यात आले असून बहुतेक सर्व उद्योग केंद्रांमध्ये पूर्वीप्रमाणे उत्पादन सुरू झाले आहे. न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जाणारा दुग्धव्यवसायही पूर्ववत झाला आहे.