ब्रिटनमध्ये आरोग्य अधिकाऱयांसमोर नवी अडचण उभी राहिली आहे. रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत असल्याने रुग्णालयांमध्ये बेड कमी पडू लागले आहेत. दिवसभरात तेथे 28 हजारांहून अधिक बाधित विविध रुग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. देशाच्या प्रत्येक हिस्स्यात बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. काही रुग्णांमध्ये नवा संकरावतार आढळून आला आहे. आरोग्य सुविधा आणि येथील कर्मचारीवर्गावर याचा गंभीर प्रभाव पडत आहे. लोकांनी सरकार तसेच आरोग्य विभागाच्या दिशानिर्देशांचे कठोरपणे पालन करावे. अन्यथा स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. आमचा कर्मचारीवर्ग किती मेहनतीने काम करत आहे हे आम्हीच जाणतो. आगामी दोन महिने महत्त्वाचे ठरणार, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱयाने म्हटले आहे.
Previous Articleटोकियो : आणीबाणी शक्य
Next Article अधिक फैलाव, पण जीवघेणा नाही
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.