मुंबई : विद्यार्थी आणि पालकांसाठीचा जगातील सर्वात मोठा ऑनलाइन प्लॅटफॉर्म असलेल्या ब्रेनलीने डी सीरीज फंडिंग राऊंड नुकताच पार पाडला. यात ८० दशलक्ष डॉलर्सची नवी गुंतवणूक झाली. अशा रितीने कंपनीचे एकूण फंडिंग १५० दशलक्ष डॉलर्सपर्यंत गेले आहे. नुकताच झालेल्या फंडिंग राऊंडमध्ये अमेरिकेतील लर्न कॅपिटलने पुढाकार घेतला. यात प्रोसस व्हेंचर्स तसेच जनरल कॅटलिस्ट पार्टनर्स यांच्यासह प्लॅटफॉर्मचे सध्याचे गुंतवणूकदार रुना कॅपिटल, मँटा रे इत्यादींनीही यात सहभाग नोंदवला. भारतीय विद्यार्थी आणि पालकांसाठी नवी उत्पादने आणण्याचा ब्रेनलीचा उद्देश आहे. तसेच ब्राझील आणि इंडोनेशिया या दोन नव्या उच्च वृद्धीच्या बाजारपेठेतही बिझनेस विस्तारण्याची प्लॅटफॉर्मची योजना आहे.
लोकल स्टडी ग्रुप्समध्ये डिजिटल परिवर्तन घडवून शिकणाऱ्यांची एक जबरदस्त ऑनलाइन कम्युनिटी तयार करण्यासाठी ब्रेनलीची स्थापना झाली. प्लॅटफॉर्मने जगभरात सतत प्रतिसाद मिळवला असून जगातील अग्रेसर पीअर-टू-पीअर लर्निंग प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आला आहे. आज, ब्रेनलीचे दर महिन्यात ३५० दशलक्षांपेक्षा जास्त युनिक यूझर्स आहेत. यापैकी ५५ दशलक्ष यूझर्स भारतातील आहेत. अमेरिका, रशिया, इंडोनेशिया, ब्राझील आणि लॅटिन अमेरिका इत्यादी ठिकाणीदेखील प्लॅटफॉर्मचे काही समूह विस्तारलेले आहेत.
ब्रेनलीचे सीईओ आणि सह संस्थापक मायकल बोर्कोव्हस्की म्हणाले, ‘मुलांना पीअर-टू-पीअर लर्निंग प्लॅटफॉर्म हवा असतो, हे आम्ही ओळखले. जागतिक स्तरावरील साथीमुळे या मॉडेलची वेगाने वृद्धी झाली. तसेच विद्यार्थ्यांची शिकण्याची पद्धतच कायमची बदलली. आज ब्रेनली हा होमवर्कमध्ये समवयस्कर आणि तज्ञांची मदत मिळण्यासाठी विद्यार्थी व पालकांसाठीचा महत्त्वाचा स्रोत बनला आहे.’