ऑनलाईन टीम / मुंबई :
पोस्ट कोविड रुग्णांमध्ये आढळणाऱ्या ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) या आजाराने महाराष्ट्रासह देशभरात थैमान घातला आहे. 4 ते 16 वर्षाच्या मुलांवरही या आजाराने हल्ला चढवला असून, यामुळे मुंबईत तीन मुलींचे डोळे काढावे लागले आहेत. फोर्टिस रुग्णालयाचे डॉ. जेसल शाह यांनी यासंदर्भात माहिती दिली.
डॉ. शाह म्हणाले, रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या दोन मुलींमध्ये ब्लॅक फंगस आढळून आला. त्यांच्या नाक, डोळे आणि सायनसमध्ये ब्लॅक फंगस पसरला होता. त्यांचा एक डोळा काळा पडला होता. सहा आठवडे त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर त्यांचा डोळा काढावा लागला.
तर डोळे आणि कॅन्सर सर्जन डॉ. पृथेश शेट्टी यांच्याकडे आलेल्या 14 आणि 16 वर्षांच्या मुलींमध्येही ब्लॅक फंगस आढळला. त्यामधील 14 वर्षीय मुलीचा मधुमेहामुळे डोळा काढावा लागला.