दिल्लीच्या मेट्रो रेल्वे मंडळाने एक अनोखे पाऊल उचलले आहे. यमुना तट डेपोमध्ये या मंडळाने स्क्रॅप मालातून (भंगारातून) इलेक्ट्रॉनिक प्रयोग शाळेची निर्मिती केली असून या प्रयोग शाळेत मेट्रो रेल्वेसाठी लागणाऱया इलेक्ट्रॉनिक आणि यांत्रिक उपकरणांची निर्मिती केली जाते. यामुळे मेट्रोचे 12 कोटी रुपये वाचले आहेत. या प्रयोग शाळेत बिघडलेल्या इलेक्ट्रॉनिक आणि यांत्रिक वस्तूंचे डिसमेंटलिंग करून त्यापासून तशाच नव्या वस्तू बनविल्या जातात. त्यामुळे त्या रेल्वेला निम्या किमतीत पडतात. दिल्ली मेट्रो रेल्वेची आवश्यकता बघता या प्रयोग शाळेमुळे मोठय़ा प्रमाणावर पैशाची आणि साधन सामुग्रीची बचत होत आहे.
मेट्रो रेल्वेची आतापर्यंतची पद्धत अशी आहे की, खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक किंवा यांत्रिक वस्तू भंगारात विकल्या जातात. हाच भंगार माल या प्रयोग शाळेकडून विकत घेतला जातो आणि बिघडलेल्या वस्तूंची पुनर्रचना केली जाते. ही प्रयोग शाळा निर्माण करताना रेल्वेचेच खराब झालेले दरवाजे, अँगल्स, बोल्ट, सीसीटीव्ही कॅमेऱयांची कॅबिनेट, तार, केबल, इत्यादी वस्तूंचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे प्रयोग शाळेच्या निर्मितीला निम्म्या पेक्षा कमी खर्च आला आहे. अशा तऱहेने ही प्रयोग शाळा मेट्रो रेल्वेला दोन्ही दृष्टींनी लाभदायक आहे. या प्रयोग शाळेत 10 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून ते खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक आणि यांत्रिक वस्तूंची दुरुस्ती करून त्यांना पुन्हा उपयोगी बनवितात.