36 भजनी मंडळांचा सहभाग : आज बक्षीस वितरण समारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर आणि इन्फिनिटी फिल्म प्रॉडक्शन आयोजित भजन स्पर्धेची मंगळवारी उत्साहात सांगता झाली. मंगळवारी 13 संघांनी सहभागी होत एकापेक्षा एक सुंदर भजन सादर केले. एकूण 36 संघांनी सहभाग घेतला. बुधवारी सायंकाळी 5 वाजता विजयी भजनी मंडळांचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
मंगळवारी या भजन स्पर्धेत हनुमाननगर येथील श्री ओमकार भजनी मंडळ, हंदिगनूर येथील श्री तळेश्वर भजनी मंडळ, कुदेमनी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळ, गोल्याळी येथील श्री रवळनाथ भजनी मंडळ, बेळगुंदी येथील श्री बालगोपाळ भजनी मंडळ, कल्लेहोळ येथील श्री हरिसंगीत कला मंच, दारोळी ता. खानापूर येथील श्री शिवगणेश भजनी मंडळ, कार्वे, ता. चंदगड येथील श्री देव कलमेश्वर भजनी मंडळ, बाकनूर येथील श्री धन्य ते माता-पिता भजनी मंडळ, तुरुंबे, ता. राधानगरी येथील श्री माऊली भजनी मंडळ, पेठ वडगाव (कोल्हापूर) येथील श्री माऊली भजनी मंडळ, तांबोळी, ता. सावंतवाडी येथील श्री स्वरधारा प्रासादिक भजनी मंडळ, वारणा (कोल्हापूर) येथील श्री राधागोविंद भजनी मंडळ आदी भजनी मंडळांनी भजन सादर करून रंगत आणली.
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भजन स्पर्धेची मंगळवारी सांगता झाली. बुधवारी विजेत्या भजनी मंडळांचा बक्षिसे देऊन गौरव केला जाणार आहे. अनुक्रमे 25 हजार, 20 हजार, 15 हजार, 10 हजार, 5 हजार यासह उत्कृष्ट गायक, तबला वादक, पेटी वादक, मृदंग आणि टाळकऱयांना बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
बुधवारी सायंकाळी कपिलेश्वर मंदिर परिसरात ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तुकाराम गाथा, ज्ञानेश्वर आणि विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीचे पूजन केले जाणार आहे. त्यानंतर मारुती महाराज यांचा हरिपाठाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर शेकडो वारकऱयांच्या उपस्थितीत ‘गजर, टाळ-मृदंगाचा’ हा कार्यक्रम होणार आहे. एकाच वेळी टाळ-मृदंगांचा गजर होणार आहे. वारकऱयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.